सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील माहेर असलेल्या गोवा येथील वृषाली सुलेकर वय ५५ वर्ष यांचे डंपर व मोटरसायकल अपघातात निधन झाले आहे. सावंतवाडी शहरात त्यांचे शिक्षण झाले. त्यांचे गोवा येथे वास्तव्य आहे. गेल्या दोन दिवसांपुर्वी त्या कामावरून घरी येत असताना त्यांचा अपघात झाला. त्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नाभिक समाजाचे सावंतवाडीचे जेष्ठ कार्यकर्ते व संत सेना नाभिक पतसंस्थेचे संचालक हनुमंत कारीवडेकर यांच्या त्या मुलगी होत.