Home स्टोरी वृद्ध व्यवसायिकाची जीवन जगण्यासाठी एक धडपड.

वृद्ध व्यवसायिकाची जीवन जगण्यासाठी एक धडपड.

147

सावंतवाडी: दिपावली सण म्हटला की सर्वांचा आनंदाचा सण. नवनवीन कपडे, स्वादिष्ट फराळाची मेजवानी, फटाक्यांची आतिशबाजी, एकमेकांना भेटवस्तू देण्याची प्रथा, प्रत्येकाच्या घरी दिवे रंगीबिरंगी रांगोळी- आकाशदीप थोडक्यात सगळीकडे आनंदाचे वातावरण अशामध्ये एक हरवलेला आनंद जो आपल्या नजरेसमोर दिसत आहे. पर गावावरून आलेले व्यवसाय दीपावलीच्या कालावधी घरात न राहता कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी इथपर्यंत पोचतो व व्यवसाय करून घरी परततो तेव्हा दीपावलीचा सण संपलेली असते. आपल्या महाराष्ट्रीयन सणांकडून कोकणपट्ट्यातील स्थानिक गोरगरीब तसेच बाहेरून येणाऱ्या गोरगरीब व्यवसायिकांना या सणांपासून चार पैसे मिळतील अशी एक आशा असते. त्यासाठी त्यांची धडपड किती पराकष्टाची असते हे सर्वसामान्य माणसालाच कळू शकते. मोठमोठ्या मॉलमध्ये गेल्यानंतर आपण कधीच बार्गेनिंग करत नाही. परंतु सर्वसामान्य रस्त्यावर बसणाऱ्या गोरगरीब व्यवसायिकांकडे जाऊन आपण त्याने सांगितलेल्या वस्तूची अर्धी किंमत करून मागतो ती वस्तू मिळवण्यासाठी आपण त्याला मजबूर करतो. जो आपला आनंद विसरून सणासुदीच्या काळामध्ये आपल्या परिवाराला आपल्यापासून दूर ठेवून आपल्या गरजेची वस्तू जो आपल्या आपल्यापर्यंत पोहोचवतो जेणेकरून त्या व्यवसायाच्या माध्यमातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकेल. परंतु तसं काही सहकार्य त्याला भेटत नाही. उलट त्याने परवड नसल्यामुळे ती वस्तू देण्यास नकार दिल्यास त्याला वाईट बरं म्हणून निघून जातो. तेव्हा त्याची अशा आकांक्षा तेथेच खुंटली जाते. सर्वसामान्य गरीब व्यावसायिकांचा व्यवसाय व जीव जगवणे आपल्या हातात आहे. जीवन जगण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो हे ज्याचे त्यालाच माहीत असतं याचं एक उदाहरण आपल्यासमोर आहे हे छायाचित्र. हे छायाचित्र टिपलं आहे सामाजिक बांधिलकीचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते रवि जाधव यांनी.