Home राजकारण वुल्फ 1069b (Wolf 1069b)एक्सोप्लॅनेट ग्रहावर राहता येऊ शकते.

वुल्फ 1069b (Wolf 1069b)एक्सोप्लॅनेट ग्रहावर राहता येऊ शकते.

97

जगभरातील संशोधकांना पृथ्वीपासून ३१ प्रकाशवर्षे अंतरावर एक एक्सोप्लॅनेट सापडला आहे. जिथे मानवी जीव असणे शक्य आहे. म्हणजेच माणसं तिथे राहू शकतात. आतापर्यंत शास्त्रज्ञांनी ५२०० हून अधिक एक्सोप्लॅनेट शोधले आहेत. परंतु असे फक्त २०० एक्सोप्लॅनेट आहेत, जे राहण्यायोग्य आहेत. वुल्फ 1069b (Wolf 1069b) असे या एक्सोप्लॅनेटचे नाव आहे.

शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहीतीनुसार, वुल्फ 1069b येथील जमिन खडकाळ आहे. त्याचे वजन पृथ्वीच्या वजनापेक्षा १.२६ पट जास्त आहे. आणि तो पृथ्वीपेक्षा १.०८ पट मोठा आहे. लाल बटू तारा हे वुल्फ 1069 च्या भोवती फिरत आहे. मात्र वुल्फ 1069b हा ताऱ्यापासून इतक्या अंतरावर आहे की, तेथे जीवन फुलू शकते. तसेच येथे पाणी असण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या ग्रहाचा शोध खूप महत्त्वाचा ठरला आहे.

जर्मनीस्थित मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर अॅस्ट्रॉनॉमीच्या शास्त्रज्ञ डायना कोसाकोव्स्की यांनी सांगितले की, आम्ही वुल्फ 1069b चा जो काही अभ्यास केला आहे. त्यावरून हे स्पष्ट होते की तेथे जीवन शक्य आहे. वुल्फ 1069b हा ग्रह त्याच्या ताऱ्याभोवती १५.६ दिवसात एक फेरी पूर्ण करतो. हा ग्रह बुध ग्रहाप्रमाणेच सूर्याच्या अगदी जवळ आहे. मात्र ८८ दिवसांतून हा एकदा सूर्याभोवती फिरतो. तेथील पृष्ठभागाचे तापमान ४३० अंश सेल्सिअस आहे. कारण ते सूर्याच्या जवळ आहे. परंतु तो राहण्यायोग्य अंतरावर आढळला आहे. त्याचा तारा लाल बटू आहे. म्हणजेच तो सूर्यापेक्षा लहान आहे. तसेच, ते सूर्याच्या तुलनेत सुमारे 65 टक्के कमी रेडिएशन तयार करते. आणि हे दर्शविते की तेथे राहणे सोपे आहे. पृष्ठभागाचे तापमान उणे ९५.१५ अंश सेल्सिअस ते १२.८५ अंश सेल्सिअस असते. सरासरी तापमान उणे ४०.१४ अंश सेल्सिअस आहे. म्हणजेच तापमानानुसार या ग्रहावर राहता येऊ शकते.
डायनाने पुढे सांगितले की, एक खास गोष्ट म्हणजे वुल्फ 1069b ताऱ्याजवळ लॉक केलेल्या स्थितीत आहे. म्हणजेच एका बाजूला नेहमी प्रकाश असतो आणि दुसरीकडे संपूर्ण अंधार असतो. जसे चंद्र आपल्या पृथ्वीभोवती फिरतो. त्यातही एका भागात प्रकाश आहे, तर दुसऱ्या भागात अंधार आहे. याचा अर्थ पृथ्वीसारखे दिवस-रात्र असे कोणतेही सूत्र नाही. म्हणजेच दिवसा परिसरात राहता येऊ शकते.
या ग्रहाचा शोध CARMENES दुर्बिणीने लागला आहे. ही ११.५ फूट उंचीची दुर्बीण स्पेनमधील कॅलर अल्टो वेधशाळेत आहे. वुल्फ 1069b हा पृथ्वीजवळ सापडलेला सहावा राहण्यायोग्य ग्रह आहे. याशिवाय, इतर ग्रह आहेत- प्रॉक्सिमा सेंटॉरी बी, जीजे 1061 डी, टीगार्डन्स स्टार सी आणि जीजे 1002 बी आणि सी. सध्या या ग्रहांवर बायोसिग्नेचरचा शोध सुरू आहे. जेणेकरून जीवन कसे शक्य आहे? हे कळू शकेल. शास्त्रज्ञ डायनाने दिलेल्या माहितीनुसार, बाहेरील ग्रहावर जीवसृष्टीची उपस्थिती शोधण्यासाठी आणखी दहा वर्षे लागतील. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या साहाय्यानेही आपण वुल्फ 1069b च्या पर्यावरणाबद्दल जास्त माहिती घेऊ शकत नाही, कारण ते संक्रमणावस्थेत आहे. ट्रान्समिशन स्पेक्ट्रोस्कोपीने असे ग्रह पाहणे योग्य नाही, तर जगातील सर्वात शक्तिशाली स्पेस टेलिस्कोप जेम्स वेब देखील हेच काम करेल. हा अभ्यास नुकताच खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पृथ्वीबाहेरील मानवीवस्ती किती यशस्वी ठरते हे प्रत्येक मानव जातीला पाहण्यासारखे असेल.