Home स्टोरी वीज समस्या सोडविण्यासाठी माणगाव खोऱ्यातील सरपंच व ग्रामस्थांनी अधिक्षक अभियंत्यांना घातला घेराव

वीज समस्या सोडविण्यासाठी माणगाव खोऱ्यातील सरपंच व ग्रामस्थांनी अधिक्षक अभियंत्यांना घातला घेराव

119

आ. वैभव नाईक यांनी उपस्थित राहून कुडाळमधील वीज समस्या तात्काळ सोडविण्याच्या दिल्या स्पष्ट सूचना.

 

मुख्य अभियंता परेश भागवत यांच्याशी फोनवर चर्चा करत “ठेकेदार गॅंग” उपलब्ध करण्याची केली मागणी

 

 

कुडाळ: कुडाळ तालुक्यातील वीज समस्यांबाबत माणगाव खोऱ्यातील सरपंच व ग्रामस्थांनी आज कुडाळ येथील महावितरणचे अधिक्षक अभियंता विनोद पाटील यांना घेराव घालत जाब विचारला. गावागावातील वीज समस्या यावेळी मांडण्यात आल्या. दरम्यान यावेळी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून या समस्यांवर विद्युत वितरण विभागाने काय उपाययोजना केली याचा सविस्तर आढावा घेतला. तसेच महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत यांच्याशी आ. वैभव नाईक यांनी फोनवर चर्चा करत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वीज स्थितीची माहिती दिली. विज वितरणकडे ठेकेदार गॅंगची कमतरता असल्याने वीज समस्या वेळीच मार्गी लागत नाहीत. त्यामुळे ठेकेदार गॅंगची पूर्तता करण्याची मागणी श्री भागवत यांच्याकडे आ. वैभव नाईक केली. कुडाळ मध्ये दिवसभरात अनेक वेळा लाईट जाते. तासंतास लोकांना अंधारात रहावे लागत आहे. पहिल्याच पावसात विजेची एवढी गंभीर समस्या झाली आहे. त्याकडे आपण स्वतः लक्ष देऊन त्या समस्या मार्गी लावा. लोकांच्या तक्रारी दूर करा अशा स्पष्ट सूचना आमदार वैभव नाईक यांनी अधिक्षक अभियंता विनोद पाटील यांना दिल्या.

 

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाट, अतुल बंगे,राजू कविटकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, सचिन काळप, नागेश ओरोसकर,कौशल जोशी, महेश जामदार, तुषार सामंत, दिलीप नीचम, अजित परब, बापू बागवे, एम बी गावडे, राजू गवंडे, बाळा वेंगुर्लेकर,संदीप सावंत, अमित राणे, दीपक आंगणे,अजित मार्गी, गौतमी गावकर आदी उपस्थित होते.