Home स्टोरी वीज पडून १४ वर्षांची मुलगी जागीच ठार

वीज पडून १४ वर्षांची मुलगी जागीच ठार

126

काल दुपारी निलंगा तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावस पडला. या पावसामुळे शेती नुकसान तर झालीच त्याशिवाय जीवितहानीही झाली आहे. दापका मुबारकपूर तांडा येथील शेतात वीज पडून आरूषा नथुराम राठोड ही १४ वर्षांची मुलगी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत निलंगा पोलिसांनी सदरील घटनेचा पंचनामा केला आहे. सदरील मुलीचे मयत निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. निलंगा तालुक्यातील होसुर येथील शेतकरी बालाजी बिरादार या शेतकऱ्याच्या शेतात बांधलेल्या दोन बैलावर वीज कोसळल्याने दीड लाखाचे नुकसान झाले आहे. तर हरीजवळग्यातील शेतकरी रतन भगवान गिरी यांचे तीन बैल दगावले असल्याने मोठे नुकसान झाले आहे. भांगेवडीतदेखील तीन बैल दगावले आहेत. तलाठी मंडळ अधिकारी यानी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करून अहवाल निलंगा तहसिलकडे दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे अंदाजे पाच लाख रूपयांचे नुकसान झाले असून संबंधित नुकसान झालेल्या शेतकऱ्याला शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.