मसुरे प्रतिनिधी:
मसुरे मार्गाचीतड येथील गणेश मंदिर नजीक कठडा नसलेल्या विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून १४ रान डूकरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान याबाबत माहिती मिळताच वन विभागाचे कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, मालवण वनपाल श्रीकृष्ण परीट यांनी घटनास्थळी दाखल होत सर्व मृत डुकरांचे वैधकीय अधिकारी यांच्या सल्याने त्याच विहिरीत दफन केले. सर्व रानडुकरे पूर्णपणे सडून गेली होती. यावेळी सहा पशुधन विकास अधिकारी अनंत शिरसाट, पशुधन पर्यवेक्षक निलेश पवार उपस्थित होते.
येथील सुषमा परब आणि कुटुंबियांच्या मालकीच्या जमिनीत कठडा नसलेली वापर नसलेली विहीर आहे. सुमारे आठ दिवसांपूर्वी या विहिरी नजीक काही तरी पडल्याचा आवाज आला होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने या विहिरीतून दुर्गंधी येऊ लागल्या नंतर विहिरीत डोकावून पहिल्या नंतर सर्व रानडुकरे मृत झालेली दिसून आली. याबाबत अशोक सांडव यांनी वनविभागाला कळविले. वनविभागाचे वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी वैधकीय अधिकारी यांच्यासह पाहणी करून सर्व डुकर मृत झाल्याने जमीन मालकांच्या परवानगीने या विहिरीत
वडाचापाट येथील उद्योजक दया देसाई यांच्या जेसीबी च्या सहाय्याने
माती टाकून सर्व डुकरांचे दफन केले. यावेळी वनरक्षक शरद कांबळे, संजीव जाधव, अनिल परब, पोलीस पाटील नेवेश फर्नांडिस, दया देसाई,सत्यविजय भोगले, रोहन पाताडे, दिलीप परब, यधनेश गुरव, अमित बागवे, भूषण मसुरेकर, साईप्रसाद बागवे, सचिन गोलतकर, केतन कांबळी आदींनी सहकार्य केले.