कल्याण प्रतिनिधी :(आनंद गायकवाड) – विश्वभूषण डॉ . बाबासहेब आंबेडकर यांची केवळ जयंतीच साजरी करायची नाही तर जयंतीच्या निमित्ताने शाहू -फुले – आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांशी सांगड घालत शाहू -फुले -आंबेडकर या आदर्शांचे जिवन चरित्र समाजासह शालेय विद्यार्थ्यांना कितपत ज्ञात आहे याची चाचपणी करण्यासाठी कल्याण पूर्वेतील आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या विद्यमाने रविवारी स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते . समितीच्या या उपक्रमाला समाज बांधवांनी उत्फुर्त असा प्रतिसाद देत ही स्पर्धा यशस्वी केली.
विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे या वर्षीच्या अध्यक्षा आयुष्यमती सिंधुताई मेश्राम आणि त्यांच्या कमिटी पदधिकारी / सहकारी भगीनी यांच्या मार्गदर्शना खाली आणि अनिल एटम सर, ओमप्रकाश धनवीजय सर आणि विलास पवार यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेत एक हजाराहून अधिक विविध वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कल्याण पूर्वतील नुतन ज्ञान मंदीर, सम्राट अशोक विद्यालय, सिध्दार्थ विद्यालय, भाल येथील जे . सी . एम . मराठी हायस्कूल आदी शाळांमध्ये सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत ही स्पर्धा परिक्षा पार पडली . या परिक्षेत फुले – शाहु – आंबेडकर यांच्या जिवन चरित्रावर आधारीत प्रत्येकी ४ पर्याय असलेले ५० प्रश्न विचारण्यात आले होते . प्रत्येक प्रश्नाला एका अचुक पर्यायावर मार्क ( निशाणी ) करायचा होता.
स्पर्धेतील गुणानुक्रमे प्रथम तिन आणि उत्तेजनार्थ अशा विजेत्यांना जयंती उत्सव सोहळ्यात रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने जाहिर करण्यात आले आहे .या स्पर्धेच्य परिक्षेच्या पर्यवेक्षकांची जबाबदारी अनेक महिला धम्म भगिनींनी चोख पार पाडली .स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आयु . अण्णा रोकडे, देवचंद अंबादे, केतन रोकडे, पराग मेंढे, अशोक भोसले, आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून स्पर्धेच्या आयोजकांना शुभेच्छा दिल्या .