१९ ऑगस्ट वार्ता: मोदी सरकारच्या सात योजनांमधील भ्रष्टाचारावरून कॅगच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आले. यानंतर आता विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. कॅगने खर्चावर प्रश्न उपस्थित केले. एक्स्प्रेसवेच्या बांधकामासाठी अंदाजापेक्षा जास्त खर्च झाल्याचा दावा ऑडिट रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. हे वृत्त येताच विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला घेराव घालण्यास सुरुवात केली. कॅगचा हा दावा अयोग्य असल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. वडेट्टीवार म्हणाले, कॅगचा रिपोर्ट दोन गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे. एक म्हणजे भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून केंद्रीयमंत्री नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी कॅगच्या रिपोर्टचा वापर होत आहे. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार होत असताना कॅगने फक्त गडकरींवर ताशेरे ओढले. यातून हे आता स्पष्ट होत आहे. प्रत्येक विभागामध्ये प्रचंड भ्रष्टाचार असताना कॅगने फक्त गडकरींवर ताशेरे ओढले. गडकरींच्या बाबतीत सगळेच सांगतात की, त्यांची स्वच्छ प्रतिमा आहे. विकासाच्या बाबतीत त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे. यातून त्यांना बाजूला करण्याचा दृष्टिकोन दिसतो, असेही वडेट्टीवार म्हणाले.