Home राजकारण विरोधी पक्षनेतेपदाबाबत काय म्हणाले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ?

विरोधी पक्षनेतेपदाबाबत काय म्हणाले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ?

127

१७ जुलै, मुंबई वार्ता : महाराष्ट्राच्या विधीमंडळातील विरोधी पक्षनेतेपदाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. यशवंतराव चव्हाण केंद्रात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या कमी झाल्यास विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी काँग्रेसकडे येईल. अधिवेशन सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आमचे १९ ते २० आमदार आहेत. अनेक आमदार दोन्ही पक्षाचे असल्याचे भासवत आहेत. सर्व आमदारांची मानसिकता शरद पवार यांच्यासोबत राहण्याची होती, आणि असल्याचे त्यांनी सांगितले.
जयंत पाटील म्हणाले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठांशी ते चर्चा करणार आहेत. विरोधी पक्षनेतेपदाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामे दिले आहेत. विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. कागदावर आमचा पक्ष सर्वात मोठा आहे. पण, यापैकी 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांशी चर्चा करावी लागेल.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रालय देण्यात आले आहे. ज्याची त्यांनी सुरुवातीपासूनच मागणी केली होती.