खा. विनायक राऊत आणि आ. वैभव नाईक यांच्या हस्ते मालवण तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण.
सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईक हे निष्ठावंत राहिल्याने विरोधकांकडून त्यांच्याबद्दल बदनामीकारक बातम्या पसरविल्या जात आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करत आ. वैभव नाईक जनसेवेत व्यस्त आहेत.मतदारसंघात विकास कामांचा धडाका त्यांनी लावला असून खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी मालवण तालुक्यातील विविध विकास कामांची भूमिपूजन आणि लोकर्पण करण्यात आली. त्याबद्दल ग्रामस्थांनी खा.विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला.
त्यामध्ये सावरवाड तिठा ते वराड जाणारा रस्ता भुमिपूजन निधी ३ कोटी ७ लाख, देवली काळेथर जाणारा रस्ता भूमिपूजन निधी ३ कोटी ६९ लाख, चौके ग्रामपंचायत इमारत भूमिपूजन निधी १५ लाख, चौके येथील भ. ता. चव्हाण माध्यमिक विद्यालय येथे सभागृहाचे लोकार्पण निधी ५ लाख, देवली कुलस्वामिनी मंदिर ते रामू चव्हाण घर जाणारा रस्ता भूमिपूजन निधी ५ लाख,
तसेच मालवण नगर परिषद वायरी लुडबेवाडा येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर सभामंडपाचे लोकार्पण निधी २० लाख, वायरी जाधववाडी येथे समर्थ रामदास स्वामींच्या मठाच्या कामाचे भूमिपूजन निधी १५ लाख, वायरी भूतनाथ येथील तेली पाणंद ते दक्षिणेकडे जाणारा रस्ता भूमिपूजन निधी १० लाख, वायरी भूतनाथ टिकम शाळा ते उत्तरेकडे जाणारा समुद्र किनारी रस्ता भूमिपूजन हि कामे मार्गी लावण्यात आली आहेत.
यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, सन्मेष परब, महिला उपजिल्हा संघटक सेजल परब, तालुकाप्रमुख पुनम चव्हाण,दीपा शिंदे,श्वेता सावंत, विभाग प्रमुख प्रवीण लुडबे, उमेश मांजरेकर,तपस्वी मयेकर,देवली सरपंच शाम वाक्कर,वायरी सरपंच भगवान लुडबे, देवली ग्रा. प. सदस्य सचिन मालवणकर, बंड्या लुडबे,मनोज मोंडकर, युवतीसेना तालुका प्रमुख निनाक्षी शिंदे,सुर्वी लोणे,प्रसाद आडवणकर, किशोर गावकर,तेजस लुडबे,पियुष चव्हाण,संतोष चव्हाण,जयू लुडबे,राजन लुडबे,नाना नाईक,दिलीप घारे,प्रियांका रेवंडकर,मोहन मराळ,सिद्धेश मांजरेकर,माधुरी प्रभू आदी.
चौके येथे उपविभाग प्रमुख अजित पार्टे, उद्योजक बी. जी. गावडे, सरपंच गोपाळ चौकेकर, उपसरपंच पी के चौकेकर,शाखाप्रमुख संजय गावडे, गणेश गावडे, दादा गावडे, गणेश चौकेकर,महेश पेंडूरकर, संजय पेंडूरकर,रमेश चौकेकर, दुलाजी चौकेकर,राजन सावंत, शिवप्रसाद चौकेकर,शैलेश चौकेकर,रुपेश चौकेकर,राहुल चौकेकर, दत्ता गावडे, अनिकेत घोगळे, वैभव गावडे, अर्चित सावंत सुशील चौकेकर, पुरस्कार चौकेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.