Home स्टोरी विठ्ठल जोशी यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती!

विठ्ठल जोशी यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती!

126

देवगड: देवगड तालुक्यातील तांबळडेग गावचे सुपुत्र पोलीस अंमलदार विठ्ठल दिगंबर जोशी यांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांच्या हस्ते नुकतीच बहाल करण्यात आली. विठ्ठल जोशी यांनी जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात काम केले आहे. अनेक गुन्ह्यांचा यशस्वी तपास त्यांनी केल्याने गुन्हेगार शिक्षेस पात्र ठरले आहेत. सध्या ते पोलीस नियंत्रण कक्ष सिंधुदुर्ग येथे काम करत आहेत.जोशी यांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.