६ जुलै वार्ता: एसटि महामंडळ च्या कराड ते सातारा जाणारी विजापूर-सातारा बस (क्रमांक केए-२८- २३५०) पूलाच्या कठड्याला धडकून महामार्गावर पलटी झाली. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याचा अंदाज आहे. अपघात झाल्यानंतर तात्काळ शिवडे परीसरातील नागरिकांनी प्रवाशानी जखमींना तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. बसमध्ये तीस प्रवाशी होते. या अपघातात जवळपास दहा ते पंधरा प्रवाशी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या अपघातात चालक व क्लिनर गंभीर जखमी झाले असून पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.