Home स्टोरी विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल येथे १ ते ३ नोव्हेंबर रोजी...

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल येथे १ ते ३ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

103

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजन….

 

विभागीय बुद्धिबळ स्पर्धेचे आज झाले उद्घाटन; २४० स्पर्धक सहभागी….

 

सिंधुदुर्ग: शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आणि महाराष्ट्र चेस असोसिएशन यांच्या सहकार्याने व युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा कणकवली शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी, कॉलेज येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत प्रथमतः ३० व ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी विभागीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न होणार आहेत. त्यानंतर १ ते ३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न होणार असून १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वा. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे.

 

कणकवली शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी, कॉलेज येथे आजपासून सुरु झालेल्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, म.न.पा. या जिल्ह्यातून एकूण २४० स्पर्धक सहभागी झाले. या विभागीय स्पर्धेचे उदघाटन सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, युवक कल्याण संघाचे खजिनदार प्रा. मंदार सावंत, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे सेक्रेटरी भरत चौगुले यांच्या हस्ते पार पडले. विद्या शिरस, व भरत चौगुले यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करत स्पर्धेतील नियमांची माहिती दिली.

यावेळी प्र. प्राचार्य चंद्रशेखर बाबर, श्रीकृष्ण आडेलकर, प्रा.अमर कुलकर्णी,प्रा. संजय लोहार, प्रा. नेहा गुरव आदी उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन शामली राणे, श्वेता शिरोडकर यांनी केले.