सिंधुदुर्ग: गेले काही दिवस ६२ दोन वृद्ध पुरुष आणि एक वृद्ध महिला गोवा वास्को बाजारपेठेत फुटपाथवर राहत होते. कित्येक दिवस हे वृद्ध व्यक्ती अति बिकट परिस्थितीत जीवन जगत होते. स्थानिक नागरिकांनी याबाबत वास्को पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर शुक्रवार दि. २० ऑक्टोबर रोजी वास्को बाजारपेठेत फुटपाथवरच्या या ६२ वर्षावरील दोन पुरुष व एक वृद्ध महिलेला वृद्ध ला वास्को – गोवा पोलिसांच्या मदतीने पणदुर येथील जीवन आनंद संस्था संचलित संवीता आश्रम येथे दाखल कारण्यात आले. यावेळी प्रसाद आंगणे ह्यांनी सहकार्य केले.
पणदूर येथील जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम वृद्ध निराधाराना आधार देण्याचे काम करीत आहे. रस्त्यावरील निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी संस्थेचे पदाधिकारी संदिप परब आणि त्यांचे सहकारी सतत कार्यरत आहेत. यामुळेच फक्त सिंधुदुर्ग जिल्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा या ठिकाणी रस्त्यावर कोणी निराधार व्यक्ती सापडल्यास विश्वासाने जीवन आनंद संस्था संचलित संवीता आश्रम येथे संपर्क करून या निराधार व्यक्तींना या संवीता आश्रमात दाखल करण्यात येते.