२१ जून वार्ता: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला दरवर्षी लाखो वारकरी वारीत सहभागी झाले होतात. यावर्षीही लाखो वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. वारकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून वारकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. सरकारच्या खर्चातून हे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण लागू असणार आहे. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये, दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये, अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये आणि वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळणार आहे.