मसूरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील निसर्गरम्य अशा वायंगवडे गावातील प्रसिद्ध असलेल्या श्री देवी पावणाई रवळनाथचा वार्षिक जत्रोत्सव १५ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. दुपारी मानाची ओटी भरल्या नंतर माहेर वाशिनींच्या व गावातील ग्रामस्थांच्या ओट्या भरणे नवस बोलणे व फेडणे आदी कार्यक्रम कार्यक्रम होतील. रात्री ११ वाजता देवीचा पालखी सोहळा त्यानंतर बाळकृष्ण गोरे पारपारिक दशावतार कंपनीचा पौरानिक नाट्यप्रयोग होणार आहे.उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.