मसुरे प्रतिनिधी: अयोध्या येथील श्रीराम मुर्तिच्या प्रतिष्ठापनेच्या औचित्यावर वायंगवडे पडोसवाडी या ठीकाणी श्री देव बाराचा पुर्वस मंदिरा मध्ये श्रीरामांच्या प्रतिमेचे भक्तीभावाने यथासांग पुजन नामस्मरण करण्यात आले. वारकरी बुवा कणकवली येथील श्री गणेश परब यांचे किर्तन, आरती व नंतर महाप्रसाद आदि कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.







