Home स्टोरी वायंगणी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम दि. ३ डिसेंबर रोजी उत्फूर्त प्रतिसादात संपन्न

वायंगणी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम दि. ३ डिसेंबर रोजी उत्फूर्त प्रतिसादात संपन्न

99

ग्रा.पं वायंगणी, वायंगणी हेल्पग्रुप, २० महिलाबचत गट, प्राथमिक शाळा विद्यार्थी पालक शिक्षकञ, दाभोली हायस्कूलचे राष्ट्रीय हरितसेनेचे विद्यार्थी, वायंगणी ग्रामस्थ व महिलांचा उत्फूर्त प्रतिसाद…!

 

सिंधुदुर्ग: एस आर दळवी फाऊंडेशन( I) सिंधुदुर्ग, ग्रां.प.वायंगणी, हेल्प ग्रुप वायंगणी, राष्ट्रीय हरितसेना यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित वायंगणी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम दि. ३ डिसेंबर रोजी उत्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली.

सिंधुदुर्ग जिल्हयातील वेंगुर्ला तालुक्यातील रिडले कासव संवर्धनासाठी प्रसिध्द असलेला निसर्गरम्य वायंगणी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम दि.2 डिसेंबर रोजी एस आर दळवी फाऊंडेशन (I) सिंधुदुर्ग च्यापुढाकारातून यशस्वी करण्यात आला*.ग्रा.पं वायंगणी,वायंगणी हेल्पग्रुप ,20 महिलाबचत गट,प्राथमिक शाळा विद्यार्थी पालक शिक्षकञ,दाभोली हायस्कूलचे राष्ट्रीय हरितसेनेचे विद्यार्थी ,वायंगणी ग्रामस्थ व महिलांचा उत्फूर्त प्रतिसाद

या ऐतिहासिक पर्यावरणपूरक अभिनव उपक्रमात दळवी फाऊंडेशनचे संस्थापक श्री रामचंद्र उर्फ आबा दळवी ,सौ सीता दळवी , राज्याध्यक्ष महेश सावंत,जिल्हाध्यक्ष सचिन मदने ,जिल्हासचिव विजय गावडे,जिल्हा उपाध्यक्ष चेतन बोडेकर,वेंगुर्ला तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे ,प्रसाद जाधव,सावंतवाडी अध्यक्ष तुषार आरोसकर, सचिव नितीन सावंत, दोडामार्ग तालुकाध्यक्ष संतोष गवस,कुडाळ तालुकाध्यक्ष ह्रदयनाथ गावडे ,कणकवली तालुकाध्यक्ष हेमंत राणे, देवगड तालुकाध्यक्ष संदिप कोळेकर, रिना पाटील, वैभववाडी प्रफुल्ल जाधव,  राष्ट्रीय हरित सेना अध्यक्ष महादेव नाईक, दाभोली हायस्कूल मुख्याध्यापक किशोर सोन्सूरकर, कासव मित्र तोरसकर, ग्रां.पं.वायंगणी चे सन्मा सरपंच श्री. अविनाश दुतोंडकर, उपसरपंच श्री रविंद्र धोंड, ग्रा.पं.सदस्य श्री मुणनकर, श्री मठकर, सौ. धोंड,सौ गोवेकर,सौ कांबळी, सौ नांदोस्कर, सौ परब, वायंगणी हेल्प ग्रुपचे अध्यक्ष श्री सुमन कामत, उपाध्यक्ष श्री हर्षद साळगावकर, सचिव श्री. सुनिल नाईक, श्री प्रविण राजापूरकर,श्री नारायण पेडणेकर,श्री शेखर खोबरेकर, श्री उल्हास कामत, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक श्री पेडणेकर गुरूजी, बचतगट ग्राम संघाच्या अध्यक्षा सौ वर्षा धोंड,सौ साळगावकर, वायंगणी गावातील २०  महिल्बचतगटाचे प्रतिनिधी आदींचे आभार मानावे तेवढे थोडेच आदी उपस्थित होते.

आजच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेली जि.प.प्रा.शाळा सुरंगपाणी ,शाळा वायंगणी नं २, वायंगणी नं. १ शाळांमधील विद्यार्थी, दाभोली हायस्कूलचे राष्ट्रीय हरितसेनेचे विद्यार्थी – शिक्षक -पालक-ग्रामस्थ -महिला मंडळी आदींचा उत्साह पाहून ख-या अर्थाने फाऊंडेशनचा उपक्रम यशस्वी झाल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेह-यावर दिसत होते.

एस आर दळवी फाऊंडेशन( I) सिंधुदुर्ग टीमच्या सर्व तालुकाशाखा यामध्ये कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी, देवगड,वेंगुर्ला, दोडामार्ग आदींनी उत्फूर्त सहभाग घेतला.या सर्व तालुकाशाखांचे अध्यक्ष,सचिव,व तालुका पदाधिकारी आंदीनी उत्फूर्त सहभाग घेतला.

स्वच्छता प्रतिज्ञा सर्वांनी घेतली .व स्वच्छतेला सुरूवात केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेंगुर्ला तालुकाध्यक्ष Tr प्रसाद गावडे तर प्रास्ताविक व आभार जिल्हाध्यक्ष सचिन मदने यांनी केले.

हा उपक्रम सुचविणारे व यशस्वितेसाठी अथक मेहनत घेणारे उपक्रमशील शिक्षक श्री प्रशांत चिपकर यांचे विशेष आभार मानण्यात आले.

फांऊडेशनकडून विशेष सत्कार

वायंगणी सरपंच अविनाश दुतोंडकर,उपसरपंच रविंद्र धोंड,सेवानिवृत्त शिक्षक पेडणेकर गुरूजी,राष्ट्रीय हरितसेनेचे अध्यक्ष महादेव नाईक,हेल्प ग्रुपचे उपाध्यक्ष हर्षद साळगावकर ,बचतगट ग्रामसंघाच्या अध्यक्षा सौ वर्षा धोंड,माजी सरपंच सुनिल कामत,शाळा सुरंगपाणी,वायंगणी नं1,वायंगणी नं 2 शाळांचे शिक्षक आदींचे शाल श्रीफळ देवून विशेष सत्कार करण्यात आले.

जि.प.शाळा वायंगणी नं २ ने दळवी फाऊंडेशनला दिले आभारपत्र वायंगणी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत जि.प.प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलेबाबत एस आर दळवी फाऊंडेशनला आभार पत्र वायंगणी नं 2 शाळेचे शिक्षक गोंधळी सर यांनी श्री आबा दळवी व सौ सीता दळवी यांना दिले.

फाऊंडेशनकडू शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

स्वच्छता मोहिमेत सहभागी शालेय विद्यार्थ्यांना फाऊंडेशनकडून खाऊ वाटप करण्यात आला.

संस्थापक आबा दळवी व सौ सीता दळवी यांनी स्वच्छतेबाबत स्पष्ट केला फाऊंडेशनचा उद्देश

कोरोना संकटकाळात शिक्षकांना शिक्षणातील विविध उपक्रम व प्रेरणादायी विचार मिळावेत, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमाची जाणीव व्हाव, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमातून समाजजागृती व्हावी यासाठी एस आर दळवी फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली.या मध्ये प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षकांचा समावेश आहे.निसर्गरम्य कोकणातील समुद्रकिनारे स्वच्छ रहावेत यासाठीच वायंगणी समुद्र किनारा स्वच्छता मोहिम आयोजित केल्याचे संस्थापक आबा दळवी यांनी स्पष्ट केले.