Home स्टोरी वायंगणी ग्रामस्थांचे २६ जानेवारीचे उपोषण स्थगित!

वायंगणी ग्रामस्थांचे २६ जानेवारीचे उपोषण स्थगित!

54

मसूरे प्रतिनिध: वायंगणी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामस्थांनी वायंगणी गावासाठी स्वतंत्र तलाठी , तलाठी कार्यालय इमारत दुरुस्ती व विद्युत पुरवठा या सुविधांसाठी २६जानेवारी रोजी उपोषणाला बसणार असल्याची नोटीस मालवण तहसिलदार यांना देण्यात आली होती त्यासंदर्भात तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी दोन दिवसांत सरपंच, ग्रामस्थ, आपण स्वतः,व सर्कल अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन चर्चा करुन निर्णय घेवू. त्यामुळे तुम्ही उपोषण करु नये अशि विनंती केल्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन उपोषण स्थगित करण्यात आले आहे. सरपंच श्री रुपेश पाटकर, माजी सरपंच श्री हनुमंत प्रभू, ग्रामस्थ अमित खोत ,रावजी सावंत यांनी तहसिलदार यांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाली असल्याने आजचे उपोषण स्थगित करण्यात येत असल्याचे सरपंच श्री रुपेश पाटकर यांनी सांगितले.