Home क्राईम वागदे येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या.

वागदे येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या.

367

२० सप्टेंबर वार्ता: वागदे येथील साईनाथ चंद्रकांत साटेलकर वय वर्ष ३६ यांनी आपल्या राहत्या घरात  लोखंडी बारला गळफास घेऊन आज सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केल. त्यांचे लहान भाऊ राजू चंद्रकांत साटेलकर यांनी या घटनेबाबत कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.साईनाथ चंद्रकांत साटेलकर यांची पत्नी, आई व मुलं आज ही सकाळी पाहुण्यांकडे गेली होती. सायंकाळी परत आल्यावर दरवाजा उघडल्यावर साईनाथ साटेलकर हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.  त्यांच्या आई आणि पत्नी यांनी त्यांचा लहानभाऊ राजू याला बोलावून घेतले. त्यानंतर कणकवली पोलीस स्टेशन ला कालवण्यात आलं. पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास करत आहेत. साईनाथ साटेलकर यांनी गळफास का घेतला? याबाबत अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यांचे मोबाईल तपासून पुढील तपास केला जाईल, अशी माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली. याबाबत अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस मनोज गुरव करीत आहेत.