रत्नागिरी प्रतिनिधी: वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया ही संस्था भारतातील अविश्वसणीय कामगिरी आणी रेकॉर्डस धारकांना जागतिक स्तरावर मान्यता देते आणी त्यांचा गौरव करते.पोपट नलावडे यांनी गेल्या दोन वर्षात जागतिक व देशपातळीवर नावाजलेले, चित्रपट अभिनेते, अभिनेत्री, आंतरराष्ट्रीय खेळाडू, पद्मश्री,पदविभूषण प्राप्त व्यक्तिमत्व,राजकीय क्षेत्रातील दिग्गज यांच्यासोबत 250 हून अधिक सेलिब्रेटी सेल्फी काढल्या आहेत.त्यांचा या नवीन्यपूर्ण संकल्पनेची दखल वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया या संस्थेने घेऊन हा विक्रम त्यांचा नावावर नोंदवला आहे.सदरचा रेकॉर्ड त्यांचा संकेत स्थळावर नुकताच नोंदवला गेला आहे. ८ ऑगस्ट रोजी संत तुकाराम महाराज संस्थान देहू येथे वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया या संस्थेचे CEO पवन सोळंकी,संत तुकाराम महाराज संस्थेचे विश्वस्त ह.भ.प.माणिक महाराज मोरे यांचा शुभहस्ते प्रशस्ती पत्रक,सन्मानचिन्ह आणी मेडल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
Home स्टोरी वर्ल्ड रेकॉर्डस इंडियासह महाराष्ट्रीयन सेलिब्रेटीसह जास्तीत जास्त सेल्फी हा नवीन विक्रम पोपट...