३ जुलै वार्ता: भारतातील महत्त्वाच्या व्यक्तींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून देशातील महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवण्यासाठी पाकिस्तानने भारतामध्ये १५, १६ ऑनलाईन हेरगिरी करणाऱ्या तरुणी सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे देशभरातील सर्वच जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकासह अति वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनोळखी सौंदर्यवती महिलांचे फेसबुक फ्रेंड request न स्वीकारण्याचे आदेश सरकारने आदेश दिले आहेत. पुण्यातील डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हे पाकिस्तानी तरुणी झारादास गुप्ता हिच्या प्रेमाच्या जाळ्यात आणि हनीट्रॅपमध्ये अडकले. यानंतर देशातील संरक्षण दलाची महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्यानंतर भारतात हाय अलर्ट करण्यात जाहिर आले आहे. पाकिस्तानमधील रहिवासी असलेल्या सुंदर तरुणी देशातील अति महत्त्वाच्या व्यक्तींना फेसबुक आणि इतर सोशल माध्यमातून संपर्क साधून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानने सोडलेल्या त्या सौंदर्य तरुणींपैकी झारा दास गुप्ता ही एक तरुणी आहे. याच झारादास गुप्ताच्या प्रेमात अडकून भारतातील महत्त्वाची माहिती प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानला पुरवली आहे. या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील आयएएस, आयपीएस आणि इतर अति महत्त्वाच्या व्यक्तींना सोशल माध्यमातून तरुणांनी पाठवलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत.
Home क्राईम वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनोळखी सौंदर्यवती महिलांचे फेसबुक फ्रेंड request न स्वीकारण्याचे सरकारचे आदेश!