Home स्टोरी वराड प्रशालेत वृक्षरोपण!

वराड प्रशालेत वृक्षरोपण!

148

मसुरे प्रतिनिधी:

 

ग्रामीण कृषी कार्यानुभव 2023-24 – अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस – ओरोसच्या कृषीदूतानी वराड येथील प्रशालेत वृक्षारोपण केले. या कार्यक्रमास शिक्षक मंडळी व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेचे चेअरमन आप्पासाहेब परुळेकर आणि मुख्याध्यापिका मयेकर मॅडम यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना झाडे लावा झाडे जगवा असा महत्वपूर्व संदेश दिला. गावातील प्रत्येक माणसाने एक तरी झाड लावावे असे सुचविले. कृषीदतांनी माझी माती माझा देश या अभियांनातर्गत माहिती दिली.

ही झाडे कृषी विज्ञान केंद्र किलोस सिंधुदुर्ग मार्फत मोफत पुरविण्यात आली. तसेच वराडच्या सरपंच व उपसरपंच मुख्याध्यापिका शिक्षक मंडळीनी मोठे सहकार्य केले. कृषीदूत शिवम राणे, सर्वेश सावंत, अनिकेत सूर्यवंशी, मयूर कदम, श्रेयस पुरळकर, योगेश तेली, हॅन्ड्रियन परेरा, निधीघंटी वेंकटा साई तसेच प्राचार्य परुळेकर सर, प्रा. कोरगावकर सर यानी मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस -ओरोसचे चेअरमन ब्रिगेडियर श्री सुधीर सावंत यांच्या प्रेरणेतून यावर्षी 25000 वृक्ष लागवडीच्या संकल्पाला हातभार म्हणून हा कार्यक्रम राबविण्यात आला.