Home शिक्षण वरद वाळकेची विभागीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड!

वरद वाळकेची विभागीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड!

121

 

भरतगड इंग्लिश मिडियम स्कुल मसुरेचा विध्यार्थी….

मसुरे प्रतिनिधी:

मसुरे येथील भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलचा इ. 10 वी मधील विद्यार्थी कु. वरद सतिश वाळके यांने कनेडी ( कणकवली) येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उज्वल यश संपादन करत रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला पालक तसेच क्रीडा शिक्षक समीर गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था अध्यक्ष प्रकाश परब, स्कुल कमिटी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, डॉ. अनिरुद्ध मेहंदळे, अशोक मसुरेकर, बाबाजी भोगले, मुख्याध्यापक किशोर देऊलकर आणि सर्व शिक्षक, संस्था पदाधिकारी यांनी वरदचे अभिनंदन केले आहे.