Home स्टोरी वंदे भारत एक्स्प्रेस जून महिन्यात देशातील २८ राज्यांमधून धावणार!

वंदे भारत एक्स्प्रेस जून महिन्यात देशातील २८ राज्यांमधून धावणार!

180

२७ मे वार्ता: वंदे भारत एक्स्प्रेस जून महिन्यात देशातील २८ राज्यांमधून धावणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे. पूर्वीकडील राज्यांमध्ये अजून विद्युतीकरण झाले नाही. त्यामुळे त्याठिकाणांवरुन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होऊ शकत नाही. परंतु आसाममधून पुढील आठवड्यात वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. पहिली वंदे भारत एक्स्प्रेस दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावली होती. त्यानंतर दिल्ली ते जम्मू सुरु झाली होती. सध्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, जम्मू-कश्मीर, गुजरात, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेशसह दक्षिण भारतातून ही रेल्वे धावत आहे. देशातील २१ राज्यांमधून तिचा प्रवास सुरु आहे. कोकण रेल्वे मार्गावरून १६ मे रोजी वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन यशस्वी झाली. मुंबईवरुन गोव्यासाठी १६ डब्यांची एक्स्प्रेस सुसाट धावली. आता ही गाडी जून महिन्यात सुरु होणार आहे. या गाडीमुळे प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. तेजस एक्स्प्रेसपेक्षाही कमी वेळ या गाडीने घेतला होता.

मुंबई सेंट्रेलवरुन सकाळी 6:00 वाजता सुटेल आणि गांधीनगरला 12:25 वाजता पोहचणार आहे. गांधीनगरवरुन दुपारी 2:05 वाजता सुटेल तर मुंबईत रात्री 8:25 ला पोहचणार आहे.

मुंबई ते सोलापूर वंदे भारतमुंबईवरुन दुपारी 4.05 वाजता सुटते तर सोलापूरला रात्री 10.40 वाजता पोहचते. पुण्यात ही गाडी संध्याकाळी 7.10 मिनिटांनी पोहचते. सोलापूरवरुन सकाळी 6:05 वाजता सुटते तर मुंबईत दुपारी 12:35 वाजता पोहचते. पुण्यात ही गाडी सकाळी 9:15 वाजता येते.मुंबई ते सोलापूर अंतर 455 आहे.

मुंबई ते साईनगर (शिर्डी): मुंबईवरुन सकाळी 6:20 वाजता सुटते, शिर्डीला 11:40 वाजता पोहचते.शिर्डीवरुन संध्याकाळी 5:25 वाजता सुटते आणि मुंबईला रात्री 10:50 वाजता पोहचते.मुंबई ते शिर्डी अंतर 343 आहे.