सिंधूदुर्ग: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत कमळ चिन्ह की धनुष्यबाण चिन्ह ईझीएम मशीनवर असणार ? हा संभ्रम शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख आ.रवींद्र फाटक यांनी पक्षाच्या पदाधिकान्यांच्या आढावा बैठकीत निकाली काढला असून आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचाच उमेदवार महायुती तर्फे निवडणूक रिंगणात असणार असून धनुष्यबाण हीच निशाणी महायुती ध्या बत्तीने ईव्हीएम मशीनवर असेल असा विश्वास शिवसेना नेते आ. रवींद्र फाटक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पश्च पदाधिकान्यांना कणकवली येधील शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात आढावा बैठकीत दिल्याची माहिती खात्रीपूर्वक सूत्रांनी दिली आहे. लोकसभा संपर्कप्रमुख शिवसेना नेते आ. स्वींद्र फाटक यांनी आज 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या महत्वाच्या पदाधिकान्यांची आढावा बैठक घेतली या बैठकीला जिल्हाप्रमुख संजय आये जिल्हा संघटक रुपेश पावसकर, सर्व तालुकाप्रमुख, जिल्हा खजिनदार भास्कर राणे, विधानसभा संघटक, उपजिल्हाप्रमुख, तालुका समन्वयक, महिला पदाधिकारी जिल्ला चिटणीस आदी पदाधिकारी उपस्थित होते. चनागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे महायुती सरकार असल्याने भाले भाजपा नेते या मतदारसंघावर दावा करत असले तरी वरिष्ठ पातळीवर निर्णय होताना जगाकाटपात तळकोकणातील रानागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा निश्चितच शिवसेनेच्या वाचायलाच येणार आहे अशी साचती ही फाटा यांनी पक्ष पदाधिकान्याना दिली सध्या प्रसार माध्यमामध्ये या मतदारसंघावर मित्रपक्ष भाजपाकडून दावा केला जात असून संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे. वाटाघाटी मध्ये भत्ते उमेदवार शिवसेनेचा असला तरीही निवडणूक चिन्ह भाजपाचे म्हणजेच कमळ निशाणी घेऊन निवडणुकीला सामोरे जावे लागेल अशीही एक राजकीय चर्चा सुरू आहे खरेच तसे होण्याची शक्यता आहे काय? अशी शंकाही आ. पटक यांच्याकडे पक्ष पदाधिका-यांमधून या बैठकीत विचारली गेल्याचे समजत आहे. लोकसभेचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांचे नाय घेतले जात आहे ते किरण उर्फ भग्राशेत सामंत हे आपला वेळी कमळ निशाणीवर एबी फॉर्म भरतील असाही सूर उमटत आहे याबद्दलही आमदार फाटक यांच्याकडे प्रश्न या बैठकीत विचारला गेल्याचे समजते. ज्यावर आ. फाटक यांनी भले सिंधुदुर्गात शिवसेनेची राजकीय ताकद कमी असली तरीही रुनागिरी जिल्ह्या चिचसेना प्रबळ आहे. तसेच भाजपा आणि शिवसेनेची महायुती आहे त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुती ने लोकसभा निवडणूक आपण लढवणार असल्यामुळे जिधे महायुती चा उमेदवार असेल तिथे मित्रपक्ष भाजपा शिक्सेना अथवा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराला मदत करणार आणि जिये भाजपाचा उमेदवार असेल तिथे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट मदत करणार व जिथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार असेल तिथे शिवसेना भाजपा मदत करणार हे साचे सरळसूत्र असल्याचेही फाटक यानी सांगितले. एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता असून फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता लागेल असेही आमदार फाटक यांनी शिवसेना पदाधिका-यांच्या बैठकीत सांगितले एकंदरीत काज कणकवलीत झालेली शिवसेनेची आढावा बैठक ही सध्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी वरून पक्ष पदाधिकान्यामध्ये झालेली संभ्रमात्ची धूळ छाटकून पक्ष पदाधिकाऱ्यांना रिचार्ज करणारी ठरली असे म्हणावे लागेल.