देवगड: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर देवगड येथे बेकायदा बंदूका बाळगल्या प्रकरणी तळवडे येथिल दोघांना काह्यात घेण्यात आले असून दोन बंदूका आणि काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडुन करण्यात आली आहे. दोन्ही कारवायांमध्ये ४० सहस्र मुद्देमाल काह्यात करण्यात आला असून दोघांवरही बेकायदा बंदूक बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजिंक्य महादेव राऊत, रमेश दत्ताराम लाड ( दोघे रा. तळवडे-लाडवाडी ) लाड याच्या घराच्या मागे ही बंदूक लपविण्यात आली होती तर राऊत यांच्या आंब्याच्या बागेत गवताच्या गंजीत बंदूक लपवून ठेवण्यात आली होती. त्या ठिकाणी या बंदूका आढळून आल्या आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरिक्षक रामचंद्र शेळके, यांनी केली आहे. त्या दोघांवर देवगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ५ एप्रिल दिवशी न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर ही कारवाई करण्यात आली आहे.
Home क्राईम लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर देवगड येथे बेकायदा बंदूका बाळगल्या प्रकरणी दोघांवर दाखल.