Home स्टोरी लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्यलढ्यातील समर्पण हे देशवासियांना नेहेमीच प्रेरणा देत राहील! पंतप्रधान...

लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्यलढ्यातील समर्पण हे देशवासियांना नेहेमीच प्रेरणा देत राहील! पंतप्रधान नरेंद्र मोदी

113

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त ट्वीट करून अभिवादन.

१ ऑगस्ट वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’च्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन १ ऑगस्ट या दिवशी सन्मानित करण्यात आले. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. त्यांनी ‘लोकमान्य टिळक यांचे धैर्य, त्यांनी दिलेला लढा आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे समर्पण हे देशवासियांना नेहमीच प्रेरणा देत राहील. आपल्या इतिहासातील अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या कार्याशी संबंध असलेला ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ हा पुरस्कार मिळाल्यामुळे मी खरोखरच नम्र आहे’, असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.