Home Uncategorized लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी सावंतवाडी शाखेच्यावतीने कलंबिस्त रणस्तंभ येते कारगिल विजय दिन साजरा.

लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी सावंतवाडी शाखेच्यावतीने कलंबिस्त रणस्तंभ येते कारगिल विजय दिन साजरा.

424

सावंतवाडी प्रतिनिधी: कारगिल विजय दिवसाच्या २५ व्या रौप्य महोत्सवी निमित्ताने लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी ने सैनिक सन्मान योजना मुदत ठेव योजना सुरू केली आहे. या सैनिक सन्मान योजनेचा शुभारंभ कलंबिस्त येतील सैनिकी गावात दुसऱ्या महायुद्धातील रणस्तंभ येथे माजी सैनिकांच्या उपस्थितीत दिमाखात साजरा करण्यात आला. सैनिक सन्मान योजना हाती घेऊन लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीने सैनिकांचा सन्मान केला. आहे. ही योजना निश्चितच सैनिकांना आर्थिक सन्मान प्राप्त करून देणारी ठरेल असे सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर व कलंबिस्त-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन दीनानाथ सावंत यांनी स्पष्ट केले.

 

२६ जुलैला कारगिल विजय दिन चा रौप्य महोत्सव सर्वत्र साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून शनिवारी सकाळी लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी सावंतवाडी शाखेच्यावतीने कलंबिस्त रणस्तंभ येते कारगिल विजय दिन पंचवीस वर्षे झाल्याबद्दल कलंबिस्त आजी-माजी सैनिक संघटना व लोकमान्य सोसायटी यांच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा करत रणस्तंभ ला पुष्पचक्र वाहण्यात आले आणि दोन मिनिटे उभे राहून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कारगिल विजय दिनाच्या आठवणींना उजाळाही देण्यात आला. यानिमित्ताने लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी सावंतवाडी शाखेतर्फे सैनिकी गावातील दोन वीर मातांचा सन्मान गौरव करण्यात आला.

भारत-पाक युद्धातील वीर माता श्रीमती सरस्वती बाबली राजगे व श्रीलंका युद्धातील श्रीमती राजेश्री वासुदेव सावंत या दोघांचाही शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष कॅप्टन दीनानाथ सावंत व कॅप्टन सुभाष सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे कारगिल विजय दिन रौप्य महोत्सव वर्षानिमित्त खास सैनिक सन्मान योजना लॉन्च करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ येथे सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर व कॅप्टन दीनानाथ सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी चे मार्केटिंग मॅनेजर सौ साक्षी मयेकर, मयूर पिंगुळकर, अर्चना सरनाईक, शुभम घावरे, संदीप राऊळ, दीपक पाटील, सैनिक पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत शिरसाट, कॅप्टन सुभाष सावंत, सचिव अनंत सावंत, खजिनदार विश्वनाथ सावंत, सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, कॅप्टन अरुण सावंत, सगुण पास्ते,  बापू सावंत,  विष्णू सावंत प्रकाश सावंत, माजी सरपंच रामा म्हाडगूत, कलंबीस्त हायस्कूलचे संस्था सचिव यशवंत उर्फ बाबा राऊळ, वसंत सावंत, उपसरपंच सहदेव राऊळ, माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत, बाबू जंगम, बाबू सावंत, मुख्याध्यापक अभिजीत जाधव, दत्ताराम कदम, सुहास सावंत, प्रल्हाद तावडे, राजेश पास्ते, दीपक राऊळ, साबा शिवा राऊळ, पांडुरंग सावंत व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक मार्केटिंग मॅनेजर साक्षी मयेकर यांनी केले. लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे सैनिक सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त फायदा आजी-माजी सैनिकांनी घ्यावा. सैनिकांच्या हिताच्या दृष्टीने ही योजना हाती घेण्यात आली आहे. व्याजदर दर्जेदार असे ठेवण्यात आले आहे. १०. ८०%  व्याजदर मिळणार असून आजी-माजी सैनिकांना २५ महिन्याच्या कालावधीसाठी ही योजना असणार आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच मयूर पिंगुळकर यांनी कारगिल विजय दिनाला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सैनिकांचा सन्मान म्हणून सैनिक सन्मान योजना हाती घेण्यात आली आहे.  ही योजना निश्चितच फलदायी आहे. याचा लाभ येथील सैनिकांनी घ्यावा. असेही सूचित केले.

यावेळी सूत्रसंचालन एडवोकेट संतोष सावंत यांनी करताना लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी ही संस्था सुरू केली आहे. समाज हिताच्या दृष्टीने त्यांनी या सोसायटीच्या माध्यमातून विविध उपक्रम आतापर्यंत राबवले आहेत. कारगिल विजय दिनाला २५ वर्ष निमित्ताने माजी सैनिक यांच्यासाठी सन्मान योजना हाती घेतली आहे. ही योजना सैनिकांचा सन्मान करणारे आहे याचा लाभ अधिकाधिक घ्या व विविध योजना चा लाभ घ्या असे आवाहनही केले. उपस्थितांचे आभर मयूर पिंगुळकर यांनी मानले.