सावंतवाडी प्रतिनिधी: माझ्या विजयात जिल्ह्यातील सर्व सीनियर ज्युनिअर वकिलांचा वाटा मोठा आहे. तसाच लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीचाही माझ्या विजयात मोठा हातभार आहे. मी अनेक बँकांच्या व संस्थेच्या पॅनलवर वकील म्हणून कार्यरत आहेत. पण लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी ने मी एक त्यांच्या परिवारातील कुटुंबातील समजून माझा येथे जो काही गौरव सन्मान केला या सन्मानाने मी भारावून गेलो आहे. बँकिंग को-ऑपरेटिव्ह क्षेत्रातील कायद्याच्या समस्या अडीअडचणी कशा सोडवता येतील आणि त्यावर कशी मात करता येतील यासाठी निश्चितपणे आपण प्रयत्न करेन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवोदित वकिलांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्यासाठी बँकिंग व आदी क्षेत्रात नवीन वाटा कशा शोधता येतील या दृष्टीनेही मी उपक्रम राबवणार आहे. असे सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अँड परिमल नाईक यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी येथील लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या रीजनल ऑफिस मध्ये जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्षॲड परिमल नाईक यांचा लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या परिवाराच्या माध्यमातून सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी एडवोकेट नाईक यांचा शाल, श्रीफळ व दिवा, पणती, झाड भेटवस्तू देऊन रिजनल मॅनेजर आनंद सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सीनियर मॅनेजर एडवोकेट महेश तानावडे, तरुण भारत चे वितरण व्यवस्थापक सचिन मांजरेकर, तरुण भारतचे प्रतिनिधी व कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्षॲड संतोष सावंत, मार्केटिंग मॅनेजर सौ साक्षी मयेकर, सौ पल्लवी खानविलकर, सौ अर्चना सरनाईक, श्रावण धोंड आधी कर्मचारी उपस्थित होते.