Home स्टोरी लोकग्राम नाल्यातील ‘गाळाचा डोंगर’ भर रस्त्यात!

लोकग्राम नाल्यातील ‘गाळाचा डोंगर’ भर रस्त्यात!

111

पालिकेच्या सीसी टीव्ही कॅमेरॅचीही या डोंगरावर आहे नजर! कचरा न काढताच उभी केली नाल्यासाठी सुरक्षा जाळी!

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – पावसाला तोंडावर आला असतांना कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत गटारे आणि नाले सफाईची लगीनघाई सुरू झाल्याचे दिसून येत आहे. परंतु या सफाई कामावर पालिकेच्या कोणत्याची अधिकाऱ्याचे लक्ष अथवा नियंत्रण नसल्याने या सफाईत संबंधीत ठेकेदार हात की सफाई करून घेत असल्याचेच चित्र दिसून येत आहे. कल्याण पूर्वेतील मुख्य नाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकग्राम नाल्यातील गाळ गाढून सफाई झाल्याचे दर्शविले जात आहे. परंतु पुणे लिंक रोड च्या खालुन आलेल्या या नाल्यात कचऱ्याचा भला मोठा ढिग साचुन राहिला असतांनाच या नाल्यात नागरीकांनी कचरा टाकू नये म्हणून पुणे लिंक रोड च्या खालुन गेलेल्या या नाल्याच्या दोन्ही बाजुनी लोखंडी जाळी लावण्यात आली आहे. परंतु ही जाळी लावतांना मात्र नाल्यात साठलेला केर कचरा तसाच ठेवून जाळी लावण्यात आली आहे.

लोकग्राम नाल्या जवळील भिम चौकात असलेल्या पालिकेच्याच सी सी टी व्ही कॅमेर्‍याखाली नाल्यातील गाळाचा डोंगर रचून ठेवण्यात आला आहे. या दुर्गंधी युक्त गाळाच्या डोंगराने या ठिकाणचा मुख्य रस्ता अरुंद झाला असल्याने येथून येणार्‍या जाणारा नागरीकांना जिव मुठीत घेवून जावे लागत आहे. नाल्यातील गाळाचा डोंगर भिम चौकाच्या नामफलका समोरही उभा केला गेल्याने गाळ मिश्रीत पाण्यामुळे या ठिकाणी दुचाकी वाहनांचे अपघात होऊ लागले आहेत. गेली अठवडाभर नाल्यातून काढून ठेवलेला हा गाळ नागरीकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण करीत असल्याने या त्रासापासूक नागरीकांची कही सुटका होईल असा प्रश्न सुज्ञ नागरीकां कडून विचारला जावू लागला आहे.