Home क्राईम ‘लिव्ह इन पार्टनर’ सरस्वतीची हत्या प्रकरण.

‘लिव्ह इन पार्टनर’ सरस्वतीची हत्या प्रकरण.

238

९ जुना वार्ता: मिरारोड येथील गीतानगरमध्ये लिव्ह इन पार्टनरची निर्घृण हत्या प्रकरणी आता आरोपीने जबाब दिला दिला आहे. आरोपी मनोज साने याने लिव्ह इन पार्टनर लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची हत्या केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे केले आणि ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले होते. आरोपीने पोलीस चौकशीत सांगितले की, मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे आणि सरस्वतीशी कधी शारीरिक संबंध ठेवले नाही. मनोज सानेने “सरस्वती वैद्य माझ्या मुलीसारखी होती. तिने ३ जून रोजी आत्महत्या केली होती. माझ्यावर गुन्हा दाखल होईल या भीतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वत:चं आयुष्यही संपवण्याचा प्लान होता.

मृत सरस्वती आणि आरोपी मनोज साने

बुधवारी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी सांगितले की, मनोज सानेकडून करण्यात आलेल्या दाव्यांची पडताळणी केली जात आहे. इलेक्ट्रिक ट्री कटरने मृतदेहाचे लहान लहान तुकडे केल्यानंतर ते प्रेशर कुकरमध्ये शिजवण्यात आले होते. ते तुकडे सहज फेकता यावेत यासाठी त्याने हे केलं. मृतदेहाचे हे तुकडे त्याने बादली, टब, कुकर आणि इतर भांड्यांमध्ये ठेवले होते. तसंच हे तुकडे इतके बारीक केले होते की पोलीसही ते मोजू शकले नाहीत. पोलिसांनी कलम 302 अंतर्गत हत्येचा आणि 201 अंतर्गत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

मीरा भाईंदर वसई विरार पोलीस डीसीपी जयंत बजबाले यांनी सांगितलं की, त्याला ठाण्यातील न्यायालयात हजर करण्यात आलं असून 16 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत साने याने पोलिसांना सांगितलं की, 2008 मध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं होतं. तेव्हापासून औषधे सुरू आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांसमोर सानेने दिलेल्या जबाबानुसार सरस्वती स्वभावाने खूपच पझेसिव्ह होती आणि त्याच्यावर संशय घेत होती. ती दहावीची परीक्षा देण्याची तयारी करत होती आणि मनोज साने तिला गणित शिकवत होता. सातव्या मजल्यावर फ्लॅटमध्ये एका भिंतीवर बोर्डही आढळला असून त्यावर गणित सोडवलेलं होतं.