कणकवली प्रतिनिधी: दिनांक ८ मार्चच्या जागतिक दिनाचे औत्सुक्य साधून कणकवली येथील लावण्यसिंधू लोककला व चित्रपट सहकारी संस्था आणि सिंधुरत्न फाउंडेशन,महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्री.भवानी हॉल येथे महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सखी वन्स सेंटरच्या संचालिका ॲड. सुवर्णा हरमलकर , लावण्यसिंधू चित्रपट सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर उपरकर, सचिव श्री.नितीन तळेकर, संचालिका सौ.प्रांजल पराडकर, सिंधुरत्न फाउंडेशनच्या अध्यक्षा व लावण्यसिंधूच्या संचालिका सौ.अक्षता कांबळी, मिळून साऱ्याजणी मंचच्या अध्यक्षा सौ. निलम सावंत, पालव, तसेच जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र चे श्री.गुरुनाथ तिरपणकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी महिला बचत गटाच्या वस्ती स्तर संघाच्या अध्यक्षा सौ.दिव्या साळगावकर यांच्या पथकाने दिपनृत्याने समारंभास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लावण्यसिंधूचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर उपरकर यांनी केले. त्यानी संस्थेने गेली कांहीं वर्षे महिला दिनाचा उपक्रम राबवून त्यांच्या कार्याला दिशा देणे आणि संघटित महिला शक्तीचे लाभ कशाप्रकारे महिला मिळवू शकतात याबाबत माहिती विषद केली. सखी वन्स स्टॉप सेंटरच्या संचालिका सौ.सुवर्णा हरमलकर यांनी उपस्थित महिलांना कौटुंबिक,सार्वजनिकव इतर प्रकारे विना मोबदला सहाय्य करणाऱ्या केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच सदरील विषयी कायदेविषयक सल्ला देणे व अशा महिलांना योग्य संरक्षण देण्यासाठी आपली संस्था सहकार्य करीत असल्याचे सांगितले. सौ.अक्षता कांबळी यांनी आपल्याकडील महिला आता स्वेच्छेने उद्योगप्रिय बनत आहेत.
कुटुंब चालवताना त्यांना पुरुष वर्ग साथ देत आहे. म्हणून महिलांनी पुरुषांचा तिरस्कार करू नये असे आवाहन सुद्धा केले.तसेच मिळून साऱ्याजणी ग्रुपच्या प्रमुख गेली २२ वर्षे कणकवलीतील महिलाना एकत्र करून केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव केला.यावेळी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रात स्वावलंबी झालेल्या सौ. शितल मेस्त्री, लक्षुमी गवस,साक्षी आमडोस्कर,स्वप्नाली तांबे यांचा शाल, श्रिफळ,स्मृती चिन्ह व गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी सौ.प्रांजल पराडकर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.