मसूरे प्रतिनिधी: लायन्स क्लब कुडाळ आयोजित कुडाळ हायस्कूलच्या भव्य पटांगणावर आयोजित केलेल्या लायन्स फेस्टीव्हल या भव्य दिव्य कार्यक्रमात कसाल येथील उद्योजक संतोष कदम व डॉ श्रेया कदम यांची कन्या तन्वी हिने चार्टर्ड अकाउंटंट या देशपातळीवरील व्यावसायिक परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात मिळविलेल्या यशाबद्दल लायन्स क्लब,सारस्वत बँक, लायन सेवा संकुल आणि चार्टर्ड अकांऊटंट असोसिएशन यांचे वतीने सारस्वत बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री अनिल आंबेस्कर व ज्येष्ठ सीए अजित फाटक यांचे हस्ते पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देवून खास सत्कार करण्यात आला.
यावेळी सारस्वत बँकेचे संचालक जेष्ठ सीए सुनील सौदागर यांनी खास मालवणी भाषेत घेतलेल्या मुलाखतीत तन्वी हिने मालवणी बोलीभाषेच्या खास शैलीत उत्तर देताना सांगितले की क्षेत्र कोणतेही असो, जिद्द, चिकाटी, मेहनत ,सातत्य, एकाग्रता आणि आत्मविश्वास यावर ते अधोरेखित करता येते.आणि यावरच मी हे यश मिळविले आहे.भविष्यात याहूनही या क्षेत्रातील मोठे यश मिळवून मी सिंधुदूर्ग जिल्ह्याचा नाव उंचावर नेऊन पुन्हा एकदा अशा सत्कारास पात्र ठरेन असे सांगितले.
यावेळी उद्योजक संतोष कदम, डॉ श्रेया कदम,अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर, अँड अमोल सामंत, अँड अजित भणगे,श्रीनिवास नाईक, गणेश म्हारदलकर, सीए सागर तेली सारस्वत बँक कुडाळ शाखाधिकारी योगेश ठाकूर आणि लायन्स क्लब चे पदाधिकारी आणि सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.