Home क्राईम लहान मुलांना खोकल्यासाठी देण्यात येणाऱ्या सिरपचा नशेसाठी वापर! एन. डी. पी. एस....

लहान मुलांना खोकल्यासाठी देण्यात येणाऱ्या सिरपचा नशेसाठी वापर! एन. डी. पी. एस. पथकाची कारवाई

52

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर – शहर पोलिसांच्या एन. डी. पी. एस. पथकाने नशेच्या बाजारात जाणाऱ्या ९२ सिरपच्या बाटल्या ताब्यात घेतल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात नशेखोरीचं प्रमाण वाढलं आहे. मात्र आतापर्यंत बटन नावाच्या नशेच्या गोळीने नशा करणाऱ्यांमध्ये नवीन पद्धत समोर आली आहे. कारण लहान मुलांना खोकल्यासाठी देण्यात येणाऱ्या सिरपचा नशेखोरीसाठी वापर होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या एनडीपीएस पथकाने नशेच्या बाजारात जाणाऱ्या ९२ सिरपच्या बाटल्या ताब्यात घेतल्या आहेत. सय्यद सोहेल सय्यद मेहमूद (वय २९ वर्षे, रा. रेल्वे स्टेशन परिसर) आणि शहजाद मंजूर शेख (वय २४ रा. भारतनगर, बिडकीन) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

मेडिकल चालक यांची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात….विशेष म्हणजे सिरपचे औषध डॉक्टराच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकता येत नाही. ज्या मेडिकलमधून हे औषध विकले गेले त्याला रुग्णाची नोंद करुन घ्यावी लागते. विशेष म्हणजे ४२ रुपये किंमत असणारे हे सिरप काळ्याबाजारात २०० रुपयांत मिळते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या औषधाचा नशेसाठी वापर होत असल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळे प्रिस्क्रिप्शनशिवाय हे औषध विकणाऱ्या मेडिकल चालक यांची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात यात आणखी काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.