Home स्टोरी लष्कराचे ALH ध्रुव हेलिकॉप्टरचा अपघात

लष्कराचे ALH ध्रुव हेलिकॉप्टरचा अपघात

132

जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवारजवळ लष्कराचे ALH ध्रुव हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. पायलट जखमी झाले असले तरी त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. तसेच पुढील तपास देखील सुरु आहे. असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. भारतीय लष्कराचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर कसे कोसळले? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, खराब हवामानामुळे अपघात झाला असावा असा प्रथम अंदाज आहे. जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांत गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पाऊसही पडत आहे. त्यामुळे हा अपघात खराब हवामानामुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.