Home स्टोरी ‘लव्ह जिहाद’विषयी हिंदू जागृत होण्याच्या भीतीने ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला विरोध! अधिवक्त्या...

‘लव्ह जिहाद’विषयी हिंदू जागृत होण्याच्या भीतीने ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला विरोध! अधिवक्त्या मित्तल

92

‘द केरला स्टोरी’ बंदी चित्रपटावर कि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर?’ या विषयावर विशेष संवाद!

सिंधुदुर्ग: ‘लव्ह जिहाद’ या संवेदनशील विषयावर ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट बनवणारे निर्माते आणि दिग्दर्शक यांचे अभिनंदन केले पाहिजे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सरकारने ‘द केरला स्टोरी’वर बंदी घातली. साम्यवादी आणि मुसलमानांचे तुष्टीकरण करणार्‍या या राज्य सरकारांना न्यायालयाने याविषयी फटकारल्यावरही हिंदूंच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला यांनी ठेच पोचवली. या राज्यात चित्रपटावर बंदी जरी घातली असली, तर आता भारतातच नव्हे विदेशातसुद्धा अनेक देशांत हा चित्रपट प्रदर्शित झाला असून लोकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. ‘लव्ह जिहाद’ घडवून आणणार्‍या लोकांचे पितळ आता उघड झाले असून ‘द केरला स्टोरी’सारखे चित्रपट पाहून हिंदू जागृत होतील, या भीतीमुळे ‘द केरला स्टोरी’ला विरोध होत आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या मणी मित्तल यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘द केरला स्टोरी : बंदी चित्रपटावर कि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर? या विषयावरील ऑनलाईन ‘विशेष संवादा’त त्या बोलत होत्या. अधिवक्त्या मणी मित्तल पुढे म्हणाल्या की, खरे तर ‘द केरला स्टोरी’मध्ये ‘लव्ह जिहाद’विषयी थोडेसे दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती खूप भयानक आहे. हिंदूंच्या विरोधात अनेक ‘ओ माय गॉड’, ‘पीके’ असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले, तसेच ‘आश्रम’सारख्या वेब सीरीजमधून हिंदु धर्म आणि ऋषिमुनी यांचा अपमान करण्यात आला. ‘द केरला स्टोरी’ला विरोध करणारे त्या वेळी गप्प होते. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाला हिंदूंनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला पाहिजे.

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की, ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट फक्त केरळपुरता मर्यादित नसून संपूर्ण देश-विदेशात ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र चालू आहे. या चित्रपटातून ‘आय.एस्.आय.एस्.’ या आतंकवादी संघटनेचे वास्तव समोर आले आहे. या चित्रपटाला काही पक्षांचे राजकीय नेते विरोध करत असतील, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त अल्पसंख्यांकांसाठी आहे का? ‘लव्ह जिहाद’ आणि ‘आतंकवाद’ यांचे वास्तव न स्वीकारून ‘हा चित्रपट मुसलमानांच्या विरोधात आहे’, असा भ्रामक प्रचार केला जात आहे. चित्रपट बनवणार्‍यांनी जे धाडस दाखवले आहे, त्या सर्वांचे हिंदु जनजागृती समिती अभिनंदन करते. हिंदू समाज आता जागृत असून ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा, यासाठी अनेक लोक सोशल मीडियासह विविध माध्यमांतून प्रसार करत आहेत, ते सुद्धा अभिनंदनास पात्र आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’, ‘द केरला स्टोरी’ यांसारखे हिंदूंना जागृत करणारे अनेक चित्रपट बनवणे गरजेचे आहे.

आपला नम्र, श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.(संपर्क : 99879 66666)