लडाख: लडाखमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. कियारी शहरापासून सात किमी अंतरावर झालेल्या अपघातात भारतीय लष्कराच्या नऊ जवानांना जीव गमवावा लागला. त्यांचे वाहन दरीत कोसळले. या घटनेत इतर अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना घडली, तेव्हा सैनिक कारू चौकीतून लेहजवळील कायरीकडे जात होते. मृतांमध्ये 2 जेसीओ आणि 7 जवानांचा समावेश आहे. लडाखमधील घटनेची पुष्टी करताना, एका संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, कियारी शहरापासून 7 किमी अंतरावर त्यांचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात 9 भारतीय सैन्याच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेत इतर अनेक जण जखमी झाले आहेत.