२६ ऑगस्ट वार्ता: तामिळनाडूच्या मदुराई येथे ट्रेनला भीषण आग लागली आहे. लखनऊ- रामेश्वर ट्रेनला ही आग लागली असून या घटनेत १० जण ठार झाले आहेत आणि अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रेनमधून गॅस सिंलेंडरची तस्करी केली जात असल्यामुळे आग लागल्याचे कारण सांगितले जात आहे. तामिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी हा अपघात झाला. लखनऊ-रामेश्वरम एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. आठही बळी उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले. आग लागलेल्या डब्यात एकूण ५५ प्रवासी होते, असे सांगण्यात येत आहे.
पुनालूर-मदुराई एक्स्प्रेसमध्ये आज पहाटे ५ : १५ वाजता मदुराई यार्ड येथे खाजगी डब्यात आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून अन्य डब्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. प्रवाशांना गॅस सिलिंडरची तस्करी केल्याचा आरोप आहे ज्यामुळे आग लागली दक्षिण रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.