सिंधुदुर्ग: तालुक्यातील रास्त दराच्या धान्य दुकानांवर (रेशन दुकानांवर) विनामूल्य दिला जाणारा तांदूळ ‘प्लॅस्टिक’ सदृश्य असल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ६ एप्रिल या दिवशी तहसीलदार अमोल पाठक यांच्याकडे केली होती. यावर ‘हा पदार्थ ‘प्लास्टिक’नसून ‘फोर्टिफाइड’ तांदूळ आहे आणि तो खाण्यायोग्य आहे. अशी स्पष्टोक्ती कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी दिली. रेशन धान्य दुकानांवर विनामूल्य दिल्या जाणार्या तांदुळाविषयी शिवसेनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे संशय व्यक्त करण्यात आला होता. भेसळयुक्त धान्य वितरण थांबवावे आणि सर्वसामान्य जनतेला चांगले धान्य वितरण करावे’, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली होती.याविषयी तहसीलदार फाटक यांना सांगितले, ‘‘महाराष्ट्र शासनाने १६ जानेवारी २०२३ च्या आदेशान्वये धान्य दुकानातून ‘फोर्टिफाइड’ तांदूळ वितरणास मान्यता दिलेली आहे. सध्या रेशन दुकानातील तांदुळात प्लास्टिक दाणे आढळून येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. हा पदार्थ प्लास्टिक नसून तो ‘फोर्टिफाइड’ तांदूळ असल्याने तो खाण्यायोग्य आहे. ‘फोर्टिफाइड’ तांदूळ हा नियमितचे तांदूळ आणि इतर पोषक पदार्थ एकत्र करून बनवला जातो. त्याचे पोषणमूल्य अधिक असून शारीरिक स्वास्थ्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.
Home स्टोरी रेशन दुकानांतून वितरित करण्यात येणारा तांदूळ खाण्यायोग्य आहे! अमोल पाठक, तहसीलदार, कुडाळ