मसुरे प्रतिनिधी: कुलस्वामी सेवा मंडळ तांडेलवाडी रेवंडी आयोजित भव्य खुली जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये गुरुनाथ तुळसकर आणि सायली राऊळ यांनी विभागून प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक विभागून दिशम परब आणि स्वरा पावसकर, तृतीय क्रमांक विभागून समर्थ गवंडी आणि वैष्णवी बोडके तर उत्तेजनार्थ दूर्वा पावसकर आणि क्रांती पालव यांची निवड करण्यात आली.
प्रथम क्र विजेत्याला विभागून रोख रुपये 11111/-श्री नमित कांबळी व श्री नागेश रामू कुऱ्हाडे पुरस्कृत रोख रक्कम व स्वर्गीय शुभदा रमाकांत कांबळी यांच्या स्मरणार्थ श्री अभिजित रमाकांत कांबळी यांसकडून चषक. द्वितीय क्र विजेत्याला विभागून रोख रु. 7777 /- व चषक श्री नमित कांबळी व श्री नागेश रामू कुऱ्हाडे पुरस्कृत रोख रक्कम व स्वर्गीय शुभदा रमाकांत कांबळी यांच्या स्मरणार्थ श्री अभिजित रमाकांत कांबळी यांसकडून चषक. तृतीय क्र विजेत्याला विभागून रोख रुपये 5555 /- व चषक श्री नमित कांबळी व श्री नागेश रामू कुऱ्हाडे पुरस्कृत रोख रक्कम व स्वर्गीय शुभदा रमाकांत कांबळी यांच्या स्मरणार्थ श्री अभिजित रमाकांत कांबळी यांसकडून चषक आणि उत्तेजनार्थ विभागून प्रत्येकी रु 1111 /- व चषक, श्री नमित कांबळी व श्री नागेश रामू कुऱ्हाडे पुरस्कृत रोख रक्कम व स्वर्गीय शुभदा रमाकांत कांबळी यांच्या स्मरणार्थ श्री अभिजित रमाकांत कांबळी यांसकडून चषक मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना प्रदान करण्यात आले.
जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे उदघाटन श्रीमती स्नेहल संतोष तळाशीलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रेवंडी ग्रा सदस्य विराज तळाशीलकर, प्राजक्ता कांबळी, माजी सभापती सोनाली कोदे तळाशीलकर, मंडळाचे कार्यकर्ते विकास चेंदवणकरपांडुरंग कांबळी, राजन तळाशीलकर, चंद्रशेखर कांबळी, बंटी तळाशीलकर, निशिकांत धुळे, निकिता कांबळी, अरुण शंकर कांबळी, अभिजित कांबळी, जयप्रकाश चेंदवणकर, सागर चेंदवणकर, अभिषेक तळाशीलकर, उन्मेष कांबळी, व्यासपीठावर उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री दत्तप्रसाद पेडणेकर, श्री सिद्धेश पालव, श्री तारक कांबळी, श्री अमोल कांबळी यांनी काम पाहिले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख रकमेची बक्षिसे आणि चषक प्रदान करण्यात आले. संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन विराज तळाशीलकर यांनी केले. आभार जयप्रकाश चेंदवणकर यांनी मानले. स्पर्धेमध्ये 28 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.