मुंबई प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – विधान परिषदेच्या मा. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेबाबत विधान भवनात एका बैठकीचे आपोजन करण्यात आले होते या बैठकीस पोलीस महासंचालक, डी आर एन सेंटर रेल्वेचे पोलीस अधिकारी, जीआरपीचे तसेच रेल्वेचे पोलीस आयुक्त, अतिरिक्त, मुख्य सचिव गृह विभाग आणि दक्षता समितीच्या मुंबई, ठाणे, कल्याण या विभागातील महिला उपस्थित होत्या. मुंबईतील उपनगरात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रती दिन ८० लाख प्रवाशांपैकी २० लाख महिला रोज प्रवास करीत आहेत. या महिलांना प्रवास करतांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. स्टेशन वर पर्स खेचून पळणे, विनयभंग, बलात्कार, चैन स्नॅचिंग, अपघात, अशा अनेक प्रसंगांच्या घटनांनी महिला वर्ग त्रस्त झाला आहे. याच सर्व प्रश्नांवर उपाययोजना किंवा काय सुरक्षा यंत्रणा अमलात आणली जात आहे आणि अजून कशा प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा राबवल्या पाहिजे यावर साधक बाधक चर्चा झाली.
या समयी नीलम गोऱ्हे यांनी सगळ्यांचे प्रश्न ऐकून आणि समजून घेतले आणि त्यांनीही काही मोलाच्या बाबी निर्दाशनात आणून देवून फटका गँग संपवली म्हणून त्यांनी पोलिसांचे खास कौतुक केले. मेरी सहेली सारखे उपक्रम लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील महिलांना सुरक्षितता देण्यासाठी पोलीस कार्यारत आहेत असे सांगण्यात आले. त्यावर उपाययोजना करण्याचे सूचना आदेश देण्यात आले. ZRUCC अध्यक्ष व रेल्वे महिला प्रवासी संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्षा वंदना सोनवणे यांच्या मार्गद्शनाखाली महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी संघ उपाध्यक्षा ललिता मोरे यांनी विठ्ठलवाडी स्टेशन येथील सरकता जिना चढताना ज्या पायऱ्या आहेत त्या चढताना आधार असावा असे सुचवले आणि त्या बरोबरच अजूनही काही मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्याची नोंद घेतली जाऊन त्यासाठी लवकरच उपाय केली जाईल असे आश्वासन देण्यात आले. मुंबई, ठाणे, कल्याण येथून आलेल्या दक्षता समितीतील वंचित बहुजन आघाडी चे ठाणे शहर अध्यक्ष प्रतिका वायदंडे आणि GRP police constable आशा गायकवाड, हे ही या बैठकीस उपस्थित होत्या.