Home क्राईम राष्ट्रीय तपास संत्रणेनेचे महाराष्ट्र आणि कर्नाटकात ४० हून अधिक ठिकाणी छापे….!

राष्ट्रीय तपास संत्रणेनेचे महाराष्ट्र आणि कर्नाटकात ४० हून अधिक ठिकाणी छापे….!

146

९ डिसेंबर वार्ता: आयसीस या दहशतावादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आणि दशतवादी कट प्रकरणी राष्ट्रीय तपास संत्रणेने महाराष्ट्र आणि कर्नाटकात ४० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे. अल- कायदा आणि दहशदवादी संघटनांशी संबंध आणि दहशतवादी कट आणि कट रचण्यासाठी तरुणांना भडकवण्याच्या प्रकारांसंबंधी गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाली होती. त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

एनआयएने ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये साकीब नाचणचाही समावेश आहे. शाकीब ट्रेन ब्लास्ट प्रकरणात आरोपी होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी दरशतवाजदी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून साकीब नाचणचा मुलगा शामील नाचण अटक करण्यात आली होती. एनआयएकडून यांच्यासह १५ जणांना ताब्यात घेतलं असून शेकडो संशयितांची चौकशी सुरू आहे.