Home राजकारण राष्ट्रवादीतील फूटीनंतर काही महिला पदाधिका-यांची महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी पक्षातून केली...

राष्ट्रवादीतील फूटीनंतर काही महिला पदाधिका-यांची महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी पक्षातून केली हकालपट्टी!

392

१३ जुलै वार्ता: राष्ट्रवादीतील फूटीनंतर राज्यातील काही महिला पदाधिका-यांची महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे. उमा मुंडे (रायगड), दीपाली पांढरे (सोलापूर), कविता आल्हाट (पिंपरी), वैशाली नागवडे (पुणे), लोचन शिवले (पुणे), शीतल हगवणे (पिंपरी चिंचवड), प्रेरणा बलकवडे (नाशिक) यांना महिला संघटनेतील पदावरुन तातडीने बडतर्फ करत असल्याचे पत्र विद्या चव्हाण यांनी जारी केले आहे. विद्यमान सरकारमध्ये सामील होणा-या व मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या आमदारांना पाठिंबा दिल्याचे निदर्शनासा आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. हे कृत्य पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत विरोधी असल्याने ही कारवाई करत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.या महिला पदाधिका-यांनी या पुढील काळात राष्ट्रवादी पक्षाचे नाव, चिन्ह व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोटो व नावाचा वापर करु नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या पत्रात संबंधित महिला पदाधिका-यांना देण्यात आला आहे.