Home स्टोरी रायगडावर होणार्‍या ३५० व्‍या ‘शिवराज्‍याभिषेक सोहळ्‍या’चे साक्षीदार व्‍हा!….युवराज संभाजी छत्रपती यांचे शिवभक्‍तांना...

रायगडावर होणार्‍या ३५० व्‍या ‘शिवराज्‍याभिषेक सोहळ्‍या’चे साक्षीदार व्‍हा!….युवराज संभाजी छत्रपती यांचे शिवभक्‍तांना आवाहन.

86

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्‍याभिषेक सोहळा लोकोत्‍सव व्‍हावा. त्‍याची प्रसिद्धी जगभर व्‍हावी; म्‍हणून वर्ष २००७ मध्‍ये रायगडावर १ सहस्र शिवभक्‍तांनी प्रारंभ केलेला ‘शिवराज्‍याभिषेक’ सोहळ्‍यास अडीच ते तीन लाख शिवभक्‍त प्रत्‍यक्ष उपस्‍थित रहातात. यंदाचा ३५० वा ‘शिवराज्‍याभिषेक’ आहे. तरी लाखो शिवभक्‍तांनी या ऐतिहासिक सोहळ्‍याचे साक्षीदार व्‍हावे, असे आवाहन युवराज संभाजी महाराज यांनी पत्रकार परिषदेमध्‍ये केले. त्‍यांनी ६ जून या दिवशी होणार्‍या ‘शिवराज्‍याभिषेक’ सोहळ्‍याची माहिती दिली. ते ‘अखिल भारतीय शिवराज्‍याभिषेक महोत्‍सव समिती, दुर्गराज रायगड’ यांच्‍या वतीने बोलत होते.