Home स्टोरी रामगड येथे टेंम्पोला अफघात क्लिनर ठार.

रामगड येथे टेंम्पोला अफघात क्लिनर ठार.

370

कणकवली प्रतिनिधी: कणकवली आचरा मार्गावर आचरा येथुन कणकवली कडे बिस्कीटे कुरकुरे घेऊन जाणारा एक टेम्पो रामगड सडेवहाळ येथे जागेवरच पलटी होऊन नाटळ बौद्धवाडी तालुका कणकवली येथील रविंद्र कदम हे इसम जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी संध्या. ५ वा. सुमारास झाला.कणकवली येथील एजन्सी चा टेंपो क्र. एम एच ०७ ए. जे. २६६१ हा छोटा टेंपो आचरा येथुन दुकानदारांना बिस्किट कुरकुरे देत कणकवलीच्या सुमारास जात होता. टेंपोत ड्रायव्हर हर्षल पाताडे व मयत क्लिनर रविंद्र कदम असे दोघेच होते. रामगड सडेवाडी येथे गाडी आल्यावर अचानक गाडीचे स्टेअरींग लाॅक झाल्याने हा अफघात झाला. समोर कोणतेच वाहन, माणसे किंवा जणावरे नसल्याने मोठा अनर्थ टळला. ड्रायव्हर पाताडे रा. कणकवली याला काहीही दुखापत झाली नाही. गाडीचे मोठे नुकसान झाले. हा अपघात रामगड येथे सडेवहाळ ब्रिजवर झाला. आचर्‍या वरुन कणकवलीच्या दिशेने जात असताना डाव्या साईडची गाडी उजव्या बाजूला पलटी झाल्याने, पुलाचे संरक्षण गार्ड सुद्धा तुटले गेले. अशा अवस्थेत ड्रायव्हर काहीच करू शकले नाही. परंतु दुर्दैवाने क्लीनरचा जागीच मृत्यू झाला. येथे पूर्णपणे वळण असल्यामुळे समोरच्या गाड्या दिसत नाही आणि अशावेळी या ठिकाणी अनेक अफघात या पुर्वी झालेले आहेत.

या अपघाताचे माहिती मिळतात बेळणे पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सहदेव कांबळे व सहकारी सागर कांजर घटनास्थळी लगेच उपस्थित राहून, पंचनामा केला व मयताला कणकवली उपजिल्हारुग्णालयात पाठवले. मयत रविंद्र कदम टेंपोखाली चिरडल्याने, याच मार्गावरुन जाणार्‍या डंपरच्या सहाय्याने मयत रविंद्र कदम यांना बाहेर काढले. वाहतुक पोलिस हवालदार विकास रा. जाधव व पोलिस काॅन्स्टेबल एम. के. शिरडे यांनी तत्काळ येऊन वाहतुक व्यवस्था सुरळीत केली. यावेळी अफघाताची बातमी समजताच रामगड ग्रामस्थ धाऊन आले व सहकार्य केले.