मसुरे प्रतिनिधी:
राधारंग फाऊंडेशन आणि”अनिल/ अनुराधा तिरोडकर सदाप्रेम” या योजनेतून सिंधुदुर्ग मधील दोन दिव्यांग मुलींना आर्थिक मदत करण्यात आली. वायरी मालवण येथील मानसी विकास लाड , माणगाव येथील निशा किशोर नलगे याना प्रत्येकी २५०० रुपये डॉ. उर्मिला व डॉ.तन्मय लाल यांच्या देणगीतून देण्यात आले.
सौ सुविधा तीनईकर, डॉ. गौरी गणपतये यांनी शिफारस केली होती. मानसीच्या घरी मालवण येथे जाऊन राधारंग फाऊंडेशनचे स्फुर्ती दाते डॉ अशोक सरनाईक यांचे सहाध्यायी डॉ. सुभाष दिघे यांच्या हस्ते मानसीला चेक देण्यात आला. यावेळी सौ सुविधा तीनईकर, अरुणा सामंत, केशव भोगले, ग्रामस्थ उपस्थित होते.