Home स्टोरी राणी पार्वती देवी जुनिअर कॉलेज, सावंतवाडी मध्ये बिस्ट जोकर फिटनेस तर्फे भव्य...

राणी पार्वती देवी जुनिअर कॉलेज, सावंतवाडी मध्ये बिस्ट जोकर फिटनेस तर्फे भव्य फिटनेस फेस्टिव्हलचे आयोजन.

133

सावंतवाडी प्रतिनिधी: आर.पी.डी. जु. कॉलेज सावंतवाडी मध्ये फिटनेसप्रेमींसाठी भव्य फिटनेस फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. हा उत्सव फिटनेस आणि आरोग्याच्या प्रचारासाठी एक अद्वितीय उपक्रम होता. या फेस्टिव्हलचे आयोजन बिस्ट जोकर फिटनेसचे मालक श्री. सौरभ वारंग आणि आर.पी.डी. जु. कॉलेजचे जि. एस. भावेश सापले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

फेस्टिव्हलमध्ये mr. RPD शरीरसौष्ठव स्पर्धा, डेडलिफ्ट, प्लॅंक, दोरीउडी, क्रॉसफिट, पुशअप, स्क्वॅट्स असे खेळ आयोजित केल्या होत्या. हे फिटनेस फेस्टिव्हल २६-१२-२०२४ रोजी सकाळी ८ वाजता सुरू करण्यात आले होते. राणी पार्वती देवी जुनिअर कॉलेज येथे हा फेस्टिव्हल पार पडला. या उपक्रमामागील उद्दिष्ट म्हणजे तरुणांमध्ये फिटनेसबद्दल जागरूकता निर्माण करणे व सर्वांमध्ये निरोगी जीवनशैली रुजविणे.

विशेष म्हणजे, या स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्या यांना बिस्ट जोकर फिटनेस तर्फे दोन महिन्यांसाठी मोफत जिम सदस्यत्व देण्यात आले आहे त्याचप्रमाणे या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना ट्रॉफी व पदक प्रदान करण्यात आले. हा उपक्रम विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांच्या फिटनेस प्रवासाला पुढे नेण्यासाठी एक प्रेरणा ठरेल.

स्पर्धेमधील विविध प्रकारांमध्ये विजयी ठरलेल्या युवक आणि युवती सहभागींमध्ये जबरदस्त उत्साह दिसून आला. त्याचबरोबर फिटनेसप्रती जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास्पद ठरला आहे.