मसुरे प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशनच्या पदाधिकारी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून महासचिव पदी संजय बाबुराव शेटे ( जिम्नॅस्टिक ) यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असो. च्या मुख्य आश्रयदाते पदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड झाली होती. या कार्यकारिणीचा कालावधी 2025 ते 2029 असा असणार आहे. मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक श्री निनाद धुरी यांनी संजय शेटे यांचे खास उपस्थित राहून अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेत. संजय शेटे यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरावरन अभिनंदन होतं आहे.







