Home स्टोरी राज्यात ‘शाळेत चला अभियान’ राबविण्यात येईल….! मंत्री दिपक केसरकर

राज्यात ‘शाळेत चला अभियान’ राबविण्यात येईल….! मंत्री दिपक केसरकर

194

१६ डिसेंबर वार्ता: राज्यातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात ‘शाळेत चला अभियान’ राबविण्यात येईल, अशी माहिती मंत्री दिपक केसरकरांनी विधानसभेत दिली.

२० डिसेंबरपासून राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. तसेच निवडणूक आयोग आणि जनगणना व्यतिरिक्त इतर कोणतीही शासकीय कामं शिक्षकांना विभागाच्या परवानगीशिवाय देता येणार नाही. जिल्हा परिषदच्या शाळा बंद करणे हे राज्य सरकारचे धोरण नाही. एक विद्यार्थी असेल तरीही शिक्षक मिळेल. जेथे प्रवासाचा प्रश्न असेल त्या विद्यार्थ्याला शाळेत पोहचवणे ही शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी राहील. शिक्षक एकदा शाळेवर नियुक्त झाला तर निवृत्ती पर्यंत एकाच शाळेवर राहण्याची मुभा असणार आणि शिक्षणाच्या  गुणवत्तेचा दर्जा वाढवण्यासाठी राज्यात यापुढे जिल्हा परिषदच्या शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत. असे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी जाहीर केले आहे.